दिसलेली चूक

By Bhampak Lifestyle 2 Min Read
bhampak post

दिसलेली चूक –

आपल्याला एखाद्याची चूक दिसत असेल, तर ती जरूर दाखविली पाहिजे, परंतु चूक दाखविताना वेळ,काळ, स्थळ आणि त्या माणसाची अवस्था यांचे भान आपण ठेवायला हवे. अन्यथा आपले चूक दाखविणे दोघांच्याही तोट्याचे ठरू शकते. वेळ योग्य असेल तर चूक दाखविणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो आणि चूक मान्य करून ती दुरुस्तही केली जाते.(दिसलेली चूक)

कल्पना करा एखाद्या व्यक्तीच्या छातीत असह्य वेदना होत आहेत .त्याला तात्काळ दवाखान्यात घेऊन जाण्याची गरज आहे आणि आपण त्याला जर त्यावेळी तू व्यायाम करत नाही,योग प्राणायाम करत नाही, अशा चूका दाखवायला लागलो तर काय होईल ? आपले सांगणे त्याच्या हीताचे असते, पण वेळ अयोग्य असते.

▪️चूक दाखविण्याचा काळ अनकुल असावा.
▪️आपण चूक दाखवित असलेले स्थळ त्याची मानहानी होईल, असे नसावे.
▪️त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक अवस्था चूक मान्य करण्यास पूरक असवी,तरच आपले चूक दाखविणे दोघांच्याही हीताचे ठरते.
▪️आपली चूक दाखविणारी माणसे शक्यतो कोणाला आवडत नाहीत.
▪️खरे तर अशी चूक दाखविणारी माणसे आपली खरी हीत चिंतक असतात.
▪️अशी माणसे आपल्या जीवनात अवश्य असायला हवीत.
▪️आपल्याला त्यांच्यावर प्रेम करता आले पाहिजे.

सतत फक्त दुसऱ्याला सल्ला देणारी माणसे, स्वतः निष्क्रिय असतात. यांना दुसऱ्यात चूका शोधायची सवय असते, अशा माणसांची संगत एक क्षणही नको वाटते आणि ती नसावीही, फक्त आपण तसे आहोत का ⁉️ हे नित्य तपासावे.
दुसऱ्याची चूक दाखवून दुरुस्त करणे , हे पुण्य आहे पण वेळ,काळ ,स्थळ आणि अवस्था यांचे भान नसेल, तर असे नको असलेले पुण्य,  *घरचं झालं थोडं आणि व्याह्यांनी धाडलं घोडं ! असे होऊन जाते.(

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a Comment